सातारा : राहत्या घरातून एक वृद्ध बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोंडवे ता.सातारा येथून हिंदुराव पांडूरंग चोरगे (वय 65, रा.कोंडवे) हे दि. 21 मार्च रोजी बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेतल्यानंतरही ते सापडले नाहीत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा