मी सभा घेतली असती तर काय झालं असतं : अजित पवार

by Team Satara Today | published on : 25 November 2024


कराड : अरे ढाण्या थोडक्यात वाचला, मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं? असा मिश्कील टोला राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतण्या आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना लगावला. 

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला चांगले यश मिळाले. विधानसभा निकालानंतर आज पहिल्यांदाच कराड येथील प्रितीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. अजित पवार समोर येताच रोहित पवार यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. यावेळी अजित पवार म्हणाले की, "अभिनंदन..., बच गया... दर्शन घे दर्शन काकाचं... अरे ढाण्या थोडक्यात वाचला... मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं?" 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड उत्तरेत ‘घोरपडें’ची पकड
पुढील बातमी
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी घेतली फडणवीसांची भेट

संबंधित बातम्या