सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंताचा गोट, सातारा परिसरात झाकीर हुसेन साहेबलाल शेख रा. कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 410 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.