सातारा : पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पत्नीला बेल्टने मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शरदचंद्र मदन राजेघोरपडे याच्या विरुध्द सुषमा राजेघोरपडे (दोघे रा.रविवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 22 ऑक्टोबर रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.