सातारा : गोडोली येथील महाजन हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर गणवेशात शासकीय काम करण्यासाठी उभ्या असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश भीमराव रणबागले (वय ५१) यांच्या कानशिलात मारल्याप्रकरणी साईप्रसाद बर्गे (रा.कोरेगाव,सातारा) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बर्गे याने उपस्थित असलेल्या पोलिसाच्या कानशिलात हाताने मारून आम्हाला पोलिसांची गरज नाही, तू येथून निघून जा. असे म्हणून धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश रणबागले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करत आहे.