फलटण : फलटण नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 13 प्रभागाची आरक्षण निश्चिती करण्यात आली. इच्छुक उमेदवारांना आगामी काळात रणनीती ठरविण्यास वेळ मिळणार असून अनेक ठिकाणी महिला आरक्षण पडल्याने अनेक इच्छुक अडचणीत आले आहेत .
आरक्षण सोडत फलटण नगरपालिकेच्या सांस्कृतिक भवन मागील हॉलमध्ये काढण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सौं प्रियांका आंबेकर,तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल जाधव उपस्थित होते. विद्यार्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या व आरक्षण निश्चिती करण्यात आली.
फलटण शहराची एकूण लोकसंख्या 52118 आहे. नगरपालिकेसाठी 13 प्रभाग असून सदस्य संख्या 27 आहे. अनुसूचित जातीसाठी 5 जागा निश्चित करण्यात आल्या त्यामध्ये महिलांसाठी 3 जागा ठेवण्यात आल्या. ओबीसीसाठी 7 जागा निश्चित करण्यात आले 4 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. सर्वसाधारण जागा 15 असून त्यामध्ये 7 आरक्षित आहे.
खालील प्रमाणे आरक्षण निश्चिती करण्यात आली. प्रभाग 1 साठी अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग 2 साठी अनुसूचित जाती महिला,सर्वसाधारण, प्रभाग 3 साठी अनुसूचित जाती , सर्वसाधारण महिला, प्रभाग 4 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला, सर्वसाधारण, प्रभाग 5 साठी अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग 6 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी), सर्वसाधारण महिला, प्रभाग 7 साठी सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग 8 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी),सर्वसाधारण महिला, प्रभाग 9 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी) महिला, सर्वसाधारण, प्रभाग 10 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी) महिला,सर्वसाधारण, प्रभाग 11 साठी नागरिकांचा मागास,प्रवर्ग(ओबीसी), सर्वसाधारण महिला, प्रभाग 12 साठी अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग 13 साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण.