शैक्षणिक गुणवत्ता वाढीला प्राधान्य देणार : अनिस नायकवडी

by Team Satara Today | published on : 24 June 2025


सातारा : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणार आहे. जिल्ह्याच्या परंपरेला साजेसे काम करुन शिक्षण विभागाचा नावलौकीक वाढविणार असल्याचे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाची सुत्रे अनिस नायकवडी यांनी आज हाती घेतली. याचबरोबर शिक्षणाधिकारी (योजना) या विभागाचाही पदभार शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी स्विकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे आदी उपस्थित होते. आदर्श शाळा उपक्रमात मोठी क्रांती होत असून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी तसेच पालकांचा कल वाढविण्यासाठी काम करणार आहे, असे यावेळी बोलताना नायकवडी यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गायरान जमिनीतील पुनर्वसनाला आरफळ ग्रामस्थांचा विरोध
पुढील बातमी
कार मधून 25 हजारांची चोरी

संबंधित बातम्या