सातारा : सातारा शहर परिसरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या इच्छेविरुध्द विवाह लावून देऊन तिच्याशी शारिरीक संबंध ठेऊन तिला गर्भवती केल्याप्रकरणी तेथीलच पाच जणांवर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. १६ वर्षी युवतीने याबाबत सातारा शहर पोलिसांत तक्रार दिली असून गेल्यावर्षी दि. २५ जानेवारी २०२५ ते नोव्हेंबर २०२५ मध्ये हा प्रकार घडला. घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.
याप्रकरणी रुपाली शहाजी वाघमोडे, शहाजी संपत वाघमोडे (देवकरवाडी, पो. निगडी, ता.सातारा), शैला शंकर शिंगाडे, शंकर कमलाकर शिंगाडे, सोमनाथ शंकर शिंगाडे, (सर्व. रा. म्हाडा कॉलनीजवळ, तामजाईनगर, क्षेत्रमाहुली ता. सातारा) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांची माहिती अशी, वरील संशयितांनी फिर्यादी मुलगी ही वयाने लहान व अल्पवयीन असल्याचे माहित असताना सुद्धा त्यांनी दि. २५ जानेवारी २०२५ रोजी सोमनाथ शिंगाडे याचे सोबत म्हाडा कॉलनीत येथे लग्न लावुन दिले. त्यानंतर पती सोमनाथ शिंगाडे यांनी माहे नोव्हेंबरमध्ये सातारा येथे घरी आलेनंतर पत्नी लहान व अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याने ती दहा आठवडयांची गरोदर राहिल्याने फिर्यादी युवतीने सातारा शहर पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. महिला पोलिस कर्मचारी भालेकर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.