सातारा : पानमळेवाडी, ता. जिल्हा सातारा येथील एका रस्त्याचा प्रश्न चौदा वर्षांनी सुटल्यामुळे खऱ्या अर्थाने पानमळेवाडी ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा केला. महसूल विभागाने अत्यंत कौशल्य पूर्ण पद्धतीने सोडवून पानमळे वाडीच्या रहिवाशांना दिलासा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, पानमळेवाडी येथील गट नंबर ३१२ मधून गट नंबर ३१४ येथे वहिवाटीसाठी असणाऱ्या जागेवर मोठ्या प्रमाणात मालकी हक्क व अतिक्रमण करण्यात आले होते याबाबत पानबळेवाडीच्या एकवीस ग्रामस्थांनी लेखी तक्रार सातारा तहसील कार्यालयात केली होती. याबाबत सातत्याने कागद पुरावा व जाब जबाब नोंदवण्यात आले. परंतु, या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. अखेर तात्कालीन सातारा तहसीलदार सुभाष भागडे यांनी दि. २९ एप्रिल २०११ रोजी रोजी सदरच्या रस्त्याबाबत अधिनियम १९०६ चे कलम ५ आणि वे आदेश दिला गट नंबर ३१२ मधून गट नंबर ३१४ येण्यास पूर्वपर रस्ता खुला करून त्यामध्ये हरकत अडथळा न करण्याची सामने वाला यांना ताकीद देण्यात आली.
आज चौदा वर्षाने सातारा तहसीलदार समीर यादव यांनी कायद्याची तरतूद व बाजू भक्कमपणे मांडून महसूल विभागाच्या सेवा पंधरवडामध्ये चौदा वर्षाचा प्रश्न निकाली काढला. ज्या वेळेला मंडल अधिकारी पारवे तलाठी नलवडे, माने, गुरव, शिंदे, डेरे यांनी सहभाग घेतला होता.
महसूल विभागाने तत्परता दाखवली
या कारवाईमध्ये अतिक्रमणात असलेले संडास बाथरूम व तारेचे कुंपण सुद्धा काढण्यात आले त्यामुळे रस्ता खुला झाला. भविष्यात या ठिकाणी विकास निधीतून विकास होणार असल्याने पानमळेवाडीच्या विकासाचाही रस्ता खोलात झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे. तहसीलदार यनी दिलेल्या आदेशाचे पालन करून महसूल विभागाने तत्परता दाखवली तसेच ग्रामस्थांनीही व या दाव्यासंदर्भात दोन्ही पक्षाकडून सहकार्य मिळाल्यामुळेच हे शक्य झाल्याचे मत व्यक्त होत आहे.