विनोद जळक सातारा पालिकेचे नवे मुख्याधिकारी; अध्यादेश मंगळवारी सायंकाळी जाहीर, राज्यातील 65 मुख्याधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या

by Team Satara Today | published on : 04 November 2025


सातारा  : सातारा नगरपालिकेचे नवीन मुख्याधिकारी म्हणून विनोद जळक यांचा अध्यादेश नगरपरिषद संचालनालयाकडून जाहीर झाला आहे. राज्यातील 65 मुख्याधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या त्याबाबतचे अध्यादेश मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. जळक सध्या कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहत असून त्यांच्याकडे रहिमतपूर नगरपालिकेचा सुद्धा कार्यभार आहे.

अत्यंत मितभाषी पण कर्तव्य कठोर अशी विनोद जळक यांची ओळख आहे. प्रवरा देवळाली 'पिंपरी चिंचवड,सासवड त्यानंतर कोरेगाव अशी तब्बल सतरा वर्ष त्यांनी प्रशासकीय सेवा बजावलेली आहे.  2008 च्या प्रशासकीय बॅचचे ते विद्यार्थी आहेत. सध्या जळक हे कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारीम्हणून काम करत आहेत. कोरेगाव नगरपंचायतीचा महसूल वाढवण्याकरता 100% विक्रमी वसुलीचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले होते .कोरेगाव बरोबरच त्यांच्याकडे रहिमतपूर नगरपालिकेचा सुद्धा कार्यभार असल्याने ते तात्काळ हजर होऊ शकले नाहीत.

जळक यांची एक प्रामाणिक आणि कर्तबगार प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख आहे. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे सातारा नगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यांच्याकडे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय नगर प्रशासन विभाग सह आयुक्त हा मूळ कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे..जळक यांची पदोन्नतीने अ वर्ग नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून बदली झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वरकुटेमध्ये होणार मोफत सामुदायिक विवाह सोहळा; फुलाबाई नरळे ट्रस्ट व साईसागर फाऊंडेशनचा उपक्रम
पुढील बातमी
वाठार स्टेशनमध्ये अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू; दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक

संबंधित बातम्या