सातारा : गाडीमध्ये ठेवलेल्या सॅकसह रोख रकमेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी रात्री नऊ वाजता श्रीपाद मारुती सुतार रा. संभाजीनगर, सातारा हे त्यांची टाटा सुमो घेऊन अहिरे कॉलनी सातारा येथे गाडीतून उतरून केळी घेण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने गाडीमध्ये ठेवलेली सॅक व त्यातील 38 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.