सातारा : सुमारे 40 हजारांच्या सेंट्रिंग प्लेट्स ची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी सकाळी चार वाजण्याच्या सुमारास हॉटेल मराठा पॅलेस शेजारी असलेल्या जुन्या पाणीच्या टाकीच्या येथून सौरभ विलास दळवी रा. गार्डन सिटी, शाहूनगर, सातारा यांच्या मालकीच्या सुमारे 40 हजार रुपये किंमतीच्या 25 सेंट्रींग प्लेट्स चोरी केल्याप्रकरणी शिवतेज गणेश साळुंखे रा. कारंडवाडी, सातारा आणि एक अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार यादव करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा