सातारा : मालगाव, ता. सातारा येथून पाण्यातील चार मोटर तसेच कुट्टी मशीनच्या मोटारची अज्ञाताने चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुमारे 59 हजार रुपये किंमतीच्या या मोटारी होत्या. हा प्रकार दि. 9 ते दि. 26 डिसेंबर या कालावधीत घडला. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात मारुती लक्ष्मण कदम (वय 45, रा. मालगाव) यांनी फिर्याद दिली ओह. पोलीस हवालदार गोरे तपास करत आहेत.