सातारा : सातार्यात किल्ले अजिंक्यतार्यावर मशाल महोत्सवावेळी तिघे जण भाजले. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नसून तात्काळ आग विझली गेल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, त्यातील एकाच्या डोक्याचा भाग भाजला केला असून उपचार सुरु आहेत.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला बुधवारी अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सवाची धामधूम सुरु होती. शेकडो मावळे मशाल महोत्सवात सहभागी होण्यासाठी आले होते. मशाल महोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर सहभागी मावळे ज्योत पेटवत असताना वार्याची झुळक आली. यामुळे मशालीच्या आगीने पेट घेतला व त्या बाजूला असलेल्या तिघांना त्याची झळ बसली.
यामुळे तिघांना आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. आग लागलेल्या तिन्ही युवकांनी व बाजूला असणार्यांनी ती विझवली. अवघ्या ३ सेंकदामध्ये घडलेल्या या घटनेने थरार निर्माण झाला. दोघांना किरकोळ दुखापत झाली असून एकाच्या डोक्याला भाजल्याने त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.