अबईची वाडी येथे अवैध शिकार प्रकरणी दोघांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 11 July 2025


सातारा : अबईची वाडी येथे रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी सातारा वनविभागाने कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले. रानडुकराच्या शिकार प्रकरणी त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रवीण शिवाजी सुर्वे, रामचंद्र ज्ञानू जाधव, राहणार अबईची वाडी तालुका कराड यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. पांडुरंग सुर्वे यांच्या शेतात रानडुकराची शिकार झाल्याची माहिती कराड वनविभागाला मिळाली होती.घटनास्थळी रानडुकराचे मांस व शिकारीचे साहित्य मिळून आले. आरोपींना सुगावा लागल्यामुळे काहीजण तेथून पळून गेले. वनविभागाने रानडुकराचे मांस आणि इतर साहित्य जप्त केले आहे. 

उपवनसंरक्षक किरण जगताप व सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल कराड ललिता पाटील, वनपाल संतोष जाधवर वराडे,पूजा खंडागळे, रमेश जाधवर, सचिन खंडागळे यांनी या कारवाईत भाग घेतला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बनावट तणनाशक बनवणारी टोळी शाहूपुरी पोलिसांकडून जेरबंद
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन प्रकरणी आठ जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या