रशियाने युक्रेनच्या Dnipro शहरावर आज सकाळी सकाळी 5 ते 7 दरम्यान खतरनाक ICBM मिसाइलने हल्ला केला. मागच्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धात पहिल्यांदाच इंटरकॉन्टीनेंट बॅलिस्टिक मिसाइल्सचा वापर करण्यात आलाय. रशियाने हा हल्ला करण्यासाठी RS-26 Rubezh मिसाइलचा वापर केल्याची शक्यता आहे. अस्त्राखान भागातून हे मिसाइल डागल्याची शक्यता आहे. युक्रेनी एअरफोर्सने ICBM मिसाइलने हल्ला झाल्याची पुष्टी केली आहे. या मिसाइल शिवाय किंझल हायपरसोनिक आणि केएच-101 क्रूज मिसाइल सुद्धा वापरण्यात आली. महत्त्वाच्या संस्था आणि इमारतींच नुकसान झाल्याच युक्रेनी एअरफोर्सने पृष्टी केली आहे.
क्रूज मिसाइल्स डागण्यासाठी रशियाने आपल्या लांब पल्ल्याच्या बॉम्बवर्षक Tu-95MS विमानाचा वापर केला. या बॉम्बवर्षक विमानाने वोल्गोग्राड भागातून उड्डाण केलं होतं. किंझल हायपरसोनिक मिसाइल डागण्यासाठी MiG-31K फायटर जेटचा वापर करण्यात आला. ताम्बोव भागातून या फायटर विमानांनी उड्डाण केलं होतं. आमच्या एअर डिफेन्स सिस्टिमने दोन ब्रिटिश स्टॉर्म शॅडो मिसाइल्स पाडली, असा दावा रशियाने केला आहे. युक्रेनमधून ही मिसाइल्स डागण्यात आली होती. पहिल्यांदा युक्रेनने रशियाविरोधात या मिसाइल्सचा वापर केला.
20 नोव्हेंबर 2024 रोजी युक्रेनच्या इंटेलिजेंसने रशियन सैन्य इंटरकॉन्टीनेंटल बॅलिस्टिक मिसाइल RS-26 Rubezh डागण्याची तयारी करत आहे असं म्हटलं होतं. कपुस्तिन यार एअर बेसवरुन ही मिसाइल लॉन्च केली जातील. या भागाला अस्त्रखान सुद्धा म्हणतात. RS-26 Rubezh मिसाइलच वजन 36 हजार किलोग्रॅम आहे. एकाचवेळी 150/300 किलोटनची चार शस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. ही मिसाइल MIRV टेक्निक सुसज्ज आहे. म्हणजे एकाचवेळी चार टार्गेट्सवर हल्ला करता येईल. ही मिसाइल Avangard हायपरसोनिक ग्लाइड व्हीकल म्हणून सुद्धा ओळखली जाते.
अमेरिकेत पुढच्यावर्षी सत्ता बदल होणार आहे. ज्यो बायडेन यांच्या पक्षाचा नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. आता रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येणार आहेत. ट्रम्प यांची भूमिका नेहमीच व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अनुकूल राहिली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
