निवडणूक प्रचाराची धामधुमीत साताऱ्यात द्रविड यांच्या ऑफिससमोरील फलक लक्ष वेधून घेतोय ; फलकाची शहरात चर्चा

by Team Satara Today | published on : 25 November 2025


सातारा : सातारा नगरपालिकेची निवडणूक प्रचाराची धामधूम जोरात सुरू आहे. यामध्ये सातारा शहरातील कमानी हौद परिसरात राजगोपाल द्रविड व त्यांचे चिरंजीव ऍड. अमित द्रविड यांच्या निवासस्थानासमोर लागलेला फलक घेतोय लक्ष वेधून आहेत. फलकावर लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले असून फलकाची मोठ्या प्रमाणात चर्चा शहरात आहे.

लोकप्रतिनिधींनी केलेली न केलेल्या कामाचा पाढाच प्रश्नावलीतून द्रविड परिवाराने फलकावर छापलेला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवपालन, मध्यरात्री फटाके वाजविणे, सार्वजनिक उत्सवात डॉल्बी, लेसर लाईट, अडथळा निर्माण करणारे धोकादायक व विनापरवाना फ्लेक्स, सायलेन्सर काढून अपरात्री कर्कश आवाजात बाईक चालविणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, भटकी कुत्री नियंत्रण नाही, अवजड वाहनांचे गैरसोईचे पार्किंग, जीवघेणे दुर्लक्ष, रोड सेपरेटर परिसरात् फुटपाथ नाहीत. प्रभागात स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात नाहीत, कोणतीही साफसफाई न करता एका दिवसात कोल्ड प्रोसेसने लगेच उखडणारा रस्ता, प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, शहरातील तलाव आणि इतर जलस्त्रोतांची नियमित स्वच्छता नाही, अनधिकृत नळजोडणी, प्रमुख रस्त्यावर वेग मर्यादा फलक नाहीत, अतिक्रमणे, फुटपाथवरील अतिक्रमणाचा वाढता वेढा, बांधकाम परवानगी देताना सार्वजनिक पार्किन्न पालन केले जात नाही.

रस्ता सफाई नियमित नाही, सिग्नल यंत्रणेचा पाठपुरावा नाही, नगरसेवक फिरकत नाहीत, कोणतीही मिटींग घेतली जात नाही, सार्वजनिक पार्किंग व्यवस्था नाही, रस्त्यावरील अयोग्य स्पीडब्रेकर्सकडे सपशेल दुर्लक्ष, नगरसेवक, रूग्णालय, पोलीस फोन नंबर लावलेले नाहीत याबाबत प्रश्न विचारले आहेत.

कोणाचीही भीडभाड न ठेवता अशा पद्धतीने सामान्य मतदाराने लोकप्रतिनिधींना विचारलेले प्रश्न हे खरोखरच लोकप्रतिनिधींना आपल्या कार्याची पोचपावती देणारे असून या प्रश्नांमुळे हे लोकप्रतिनिधी निरुत्तरच होतील असेच मत अनेक सुजाण नागरिक या फलकाकडे पाहून व्यक्त करत आहेत .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मी जखमी झालो अन्यथा अनेक लोकांचे जीव वाचवू शकलो असतो - पोलीस अधिकारी अरुण जाधव यांनी जागवल्या 26/11 च्या हल्ल्याच्या थरारक आठवणी; वडूजमध्ये जाधव यांच्या शौर्याचा गौरव
पुढील बातमी
संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज साताऱ्यात संविधान दिंडीचे आयोजन ; समाज कल्याण आयुक्त सुनील जाधव यांची माहिती; सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन

संबंधित बातम्या