सातारा शहराच्या विकासासाठी भाजपला साथ द्या - ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले; सदरबाजार परिसरात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 25 November 2025


सातारा  : सातारा शहरासह हद्दवाढ क्षेत्रातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या नवीन योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आगामी काळात व्यापक विकासकामे राबवून सातारा शहराचा कायापालट घडवण्यासाठी सातारकरांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांनी केले.

सातारा नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार निशांत पाटील, भारती सोलंकी, चेतन सोलंकी आणि रेणू येळगांवकर यांच्या प्रचारार्थ सदरबाजार परिसरात आयोजित भव्य पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या पदयात्रेदरम्यान ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत भाजपच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती उत्साहवर्धक होती.

पदयात्रेची सुरुवात कनिष्क कार्यालय येथून झाली आणि न.प. चाळ, लीलावती हौसिंग सोसायटी, भीमाबाई चौक, आमने वाडा, शिंपी गल्ली, पोलीस चौकी, मारुती मंदिर, बागवान गल्ली, कसाई गल्ली, लक्ष्मी टेकडी, वडार वस्ती चौक, म्हाडा कॉलनी, इंगवले वाडा, भारतमाता चौक आदी भागात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी भाजपला साथ द्या: भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
पुढील बातमी
३५०० रूपये दर जाहीर करा अन्यथा साखर कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन- राजू शेट्टी, दर घेतल्याशिवाय मागे न हटण्याचा शेतक-यांचा निर्धार

संबंधित बातम्या