सातारा : प्रतापसिंहनगर परिसरात पती पत्नीला शिवीगाळ व दमदाटी करत फरशीच्या तुकड्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष अशोक लंकेश्वर (वय २८, रा. प्रतापसिंह नगर) हे आपल्या पत्नीसह घरी बसले असताना आरोपींनी अचानक घरात येऊन शिवीगाळ व धमकावणे सुरू केले. त्यानंतर फरशीच्या तुकड्याने डोक्यात मारहाण करण्यात आली तसेच हाताने नाकावर ठोसा मारून जखमी करण्यात आले.
या प्रकरणी विलास सर्वदे, अण्णा सर्वदे व राणी सर्वदे (सर्व रा. प्रतापसिंह नगर, खेड) यांच्याविरोधात संतोष लंकेश्वर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.