सातारा : राजलक्ष्मी टॉकीज येथे दि. 18 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास महिलेला शिवीगाळ व दमदाटीची घटना घडली आहे.
याबाबत स्मिता महेश कोठावळे (वय ४९,रा.परळी.ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलिसांत ताजुद्दीन शमशुद्दीन आगा (रा.करंजे पेठ) याच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला ही तिच्या भावाला हॉस्पिटलमध्ये भेटण्यास जात असताना संशयित आरोपी आगा हा त्या ठिकाणी आला. यावेळी संशयितांने कोर्टातील तक्रार मागे घ्या, असे बोलून महिलेला शिवीगाळ व दमदाटी केली. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.