सातारा : करंजेपेठ, सातारा येथे डंपर चालकाला जावू न देता अटकाव केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंभू नागनाथ काशीद (वय 30, रा. गोडोली) यांनी सचिन सोनावणे, संदीप जाधव, रमेश जाधव (तिघे रा. पिलेश्वरीनगर, करंजे पेठ) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 2 जुलै रोजी घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.