सातारा : बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आनंद सुभाष देसाई (वय 32, रा. चंदननगर, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 31 हजार 640 रुपये किंमतीच्या 452 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. नवीन एमआयडीसी येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दुसरी कारवाई महिलेवर कोडोली येथे करण्यात आली आहे. पोलिसांनी महिलेकडून 12950 रुपये किंमतीच्या 370 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
तिसर्या कारवाईत, ताडी प्रकरणी सोमनाथ विठ्ठल मोरे (वय 53, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 5600 रुपये किंमतीची ताडी व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई सेनॉर चौकात केली आहे.