राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धांच्या प्राथमिक फेरी उद्यापासून साताऱ्यात; शाहू कला मंदिर येथे रंगणार विविध नाट्य प्रयोग

by Team Satara Today | published on : 05 November 2025


सातारा : सांस्कृतिक कार्य विभाग आणि कार्य संचालनालय यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे साताऱ्यात या नाट्य स्पर्धांची प्राथमिक फेरी शुक्रवार,  दि.  ७ रोजी पासून सुरू होत आहे. येथील शाहू कला मंदिरामध्ये सायंकाळी सात वाजता या निमित्ताने विविध नाटकांचे प्रयोग राहणार आहेत

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे यांनी याबाबत नाट्यप्रयोगांची वेळापत्रक जाहीर केले आहे. साताऱ्यात शाहू कला मंदिर येथे नाटकांची प्राथमिक फेऱ्या सुरू होणार आहेत यामध्ये शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी डॉक्टर हेमंत कुलकर्णी लिखित दास्ता आणि बाळकृष्ण शिंदे दिग्दर्शित नाट्यप्रयोग होणार आहे.नाट्यप्रयोगांसाठी पंधरा आणि दहा रुपये तिकीट दर ठेवण्यात आलेला आहे.सर्व नाट्यनाट्य रसिकांनी या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहेत.

नाट्यप्रयोगांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे : 

दि.  8 नोव्हेंबर - आम्ही दोघेच राहायचो घरात लेखक दिग्दर्शक विक्रम सिंह बल्लाळ जागृती नाट्य कला मंच कुसवडे सातारा

दि.  ९ नोव्हेंबर नथिंग इज फेअर - लेखक दिग्दर्शक राजू मुळे लोक रंगमंच सातारा

दि. 10 नोव्हेंबर चौक - लेखक दिग्दर्शक निलेश भोसले मित्रमेळा फाउंडेशन जावली

दि.  11 नोव्हेंबर रोजी आयाम - लेखक अमित देशमुख दिग्दर्शक अजीम पटेल नेहरू युवा मंडळ शेंद्रे

दि. 12 नोव्हेंबर रोजी शिवराज्याभिषेक - लेखक दिग्दर्शक अमित देशमुख निर्मिती नाट्य संस्था सातारा

दि.  14 नोव्हेंबर 10 जून - लेखक अमित देशमुख दिग्दर्शक अरविंद पाटील परिवर्तन नवतरुण मित्र मंडळ

दि.  १५ व्हाईट पेपर - लेखक इरफान मुजावर दिग्दर्शक मंदार शेंडे प्रतीक थिएटर वाई

दि.  16 खानदानी -लेखक जगदीश पवार दिग्दर्शक शरद लिमये पुण्यशील सुमित्रा राजे सांस्कृतिक ट्रस्ट सातारा

दि.  17 सूर्यास्ताच्या अंतिम किरणापासून सूर्योदयाच्या प्रथम किरणापर्यंत - लेखक अमोल पालेकर दिग्दर्शक रवींद्र इनामदार शाहू कलाकादमी सातारा

दि.  18 ऐन चौकीत अर्ध्या रात्री - लेखक संकेत तांडेल दिग्दर्शक विजय काटकर शिव संस्कृती कला नाट्य मंडळ कुकुडवाड

बुधवार दि 19 पोकळगीस्सा - लेखक दिग्दर्शक संतोष पाटील शिवशक्ती तरुण मंडळ सातारा

गुरुवार दि.  20 आमच्या ही च प्रकरण- लेखक सचिन मोटे दिग्दर्शक हेरंब दोषी केशवराव पाटील ट्रस्ट सातारा

शुक्रवार 21 नोव्हेंबर चार दिवस प्रेमाचे लेखक - रत्नाकर मतकरी दिग्दर्शक इमरान मोमीन .सृजन फाउंडेशन सातारा

शनिवार दि.  22 नोव्हेंबर वास्तवाचा विस्तव -  लेखक डॉक्टर समीर मोने दिग्दर्शक सिद्धेश नेवसे सूर्य रत्न युथ फाऊंडेशन सातारा

रविवार दि.  23 नोव्हेंबर खेळ मांडीयेला लेखक - विशाल कदम दिग्दर्शक रोहित भोसले द स्टेज फाउंडेशन सातारा

सोमवार दि.  24 सासूबाईंचा असत असतं - लेखक प्रताप गंगावणे दिग्दर्शक रवींद्र डांगे थिएटर वर्कशॉप ऑर्गनायझेशन

मंगळवार दि.  25 नाम याची दासी - लेखक मिलिंद खरात दिग्दर्शक शुभम राणी ट्रस्ट मानवता चॅरिटेबल ट्रस्ट वाई

बुधवार दि.  26 पाहिजे जातीचे- लेखक विजय तेंडुलकर दिग्दर्शक संदीप जंगम तुषार भद्रेज दास्तान अकॅडमी ऑफ आर्ट्स

गुरुवार दि.  27 नोव्हेंबर बळ - लेखक दिलीप जगताप दिग्दर्शक किरण पवार शैक्षणिक व सामाजिक संस्था सातारा


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबझार येथील विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा
पुढील बातमी
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी; धैर्यशील कदम यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती

संबंधित बातम्या