सातारा : बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी मारुती रामचंद्र घमरे (वय 54, रा. चिंचणी पो.कामेरी ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1680 रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई
by Team Satara Today | published on : 29 October 2024