सातारा : महाबळेश्वर येथील ऑक्सिजन हॉटेलमध्ये सामानाची चोरी करून परस्पर दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असणार्या एका हॉटेल कामगाराला मुंबई येथील विमानतळावर महाबळेश्वर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून पकडले. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईत हॉटेलमधील इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर, भांडी, गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा 17 लाख 90 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
कांचन काली प्रसाद बॅनर्जी वय 54, रूम नंबर 17, नागरिक कॉलनी, वीरमाता जिजाऊ नगर, नालासोपारा वसई ईस्ट, करण दशरथ घाडगे वय 25 राहणार आंबवडे खुर्द तालुका जिल्हा सातारा, गौतम सुरेश जाधव वय 25 राहणार यशवंत नगर सैदापूर तालुका जिल्हा सातारा या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत महाबळेश्वर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दिनांक 25 ते 28 जून दरम्यान हॉटेल ऑक्सिजन येथे चोरी झाल्याची फिर्याद नोंदवण्यात आली होती. हॉटेलचा वॉचमन कांचन बॅनर्जी याने हॉटेलमधील सामान थोडे थोडे करून परिसरातील भंगार व्यवसायिकांना विकले आणि तेथून तो दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी या चोरीचे तांत्रिक विश्लेषण करून थेट मुंबई येथील सहारा एअरपोर्ट गाठले आणि तेथे चेक इन करत असताना बॅनर्जी याला ताब्यात घेतले. त्याचबरोबर भंगार विकत घेणार्या दोन्ही अन्य इसमांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सर्व सामान हस्तगत केले आहे. बॅनर्जी दुबईला पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता. पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, पोलीस अंमलदार प्रवीण कांबळे, अमित माने, ओंकार यादव, सचिन ससाणे, रवी वर्णेकर, नवनाथ शिंदे या पथकाने ही कारवाई फत्ते केली. हॉटेलमधील इलेक्ट्रॉनिक साहित्य फर्निचर भांडी आणि वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 17 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, अरुण पाटील, अमित झेंडे, अजय जाधव, गणेश खापरे, प्रमोद सावंत, अमोल माने, स्वप्निल कुंभार, अजित कर्णे, राकेश खांडके, सनी आवटे, अमित सपकाळ, हसन तडवी, राजू कांबळे, मोहन पवार, ओंकार यादव, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, रविराज वर्णेकर, रोहित निकम, प्रवीण पवार, विशाल पवार, संकेत निकम, स्वप्नील दौंड, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत करपे, संभाजी साळुंखे, विजय निकम, महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे जितेंद्र कांबळे, नवनाथ शिंदे, सलीम सय्यद यांनी सहभाग घेतला.