नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 December 2024


सातारा : घराच्या पत्र्यावर दगड टाकून नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संगीता चंद्रकांत शिंदे राहणार तासगाव तालुका सातारा यांच्या घराच्या पत्र्यावर दगड टाकून जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती केल्याप्रकरणी तसेच नुकसान प्रकरणी तेथीलच हर्षल गेनुबा शिंदे, ऋषिकेश ज्ञानेश्वर शिंदे, शिवाजी चंद्रकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा
पुढील बातमी
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या