सातारा : दुचाकीच्या डीकीतून अज्ञात चोरट्याने रोख रकमेची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोल मारुती मंदीर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डीकीतून रोख 19400 रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना दि. 11 नोव्हेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी तानाजी पिलाजी महाडीक (वय 68, रा. आरे ता.सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.