सुमारे दीड लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 02 March 2025


सातारा : सुमारे दीड लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्‍यातून तीन लॅपटॉप खरेदी करुन त्याचे पैसे न देता 1 लाख 47 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विकी श्रावणकर (रा. यवतमाळ) याच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. ही घटना दि. 23 ते 30 जानेवारी 2025 मध्ये केसरकर पेठ, सातारा येथे घडली आहे. याप्रकरणी सुरज बाळू सोनमळे (वय 31, रा. लिंब ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवा. पोळ करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
अज्ञात कारच्या धडकेत महिला जखमी

संबंधित बातम्या