सातारा : पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मारहाण केल्याप्रकरणी दिपक जगन्नाथ यादव (वय 31, रा. गडकर आळी, सातारा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुप्रिया दिपक यादव (वय 30, रा. गडकर आळी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.