सातारा : सातारा शहरासह तालुका हद्दीत पानटपरींमध्ये गुटखा, सुगंधी पान मसाले, तंबाखू ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिहे ता.सातारा येथे पानटपरीमध्ये गुटखा ठेवल्याप्रकरणी आकाश दादासो जाधव (वय 31, रा.जिहे) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 14 हजार 360 रुपये किंमतीचा विविध सुगंधी मसाला, तंबाखू जप्त केला आहे. दि. 11 नोव्हेबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दुसरा गुन्हा समीर आबाजी कांबळे (वय 32, रा.आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 165440 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवार पेठेत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.