सातारा : प्रेमविवाह करुन मुलाचे आयुष्य खराब केले, कर्ज फेडण्यासाठी माहेरहून 4 लाख रुपये आण, यासाठी गरोदर असतानाही विवाहितेला त्रास दिल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहेे.
प्रतीक्षा चंद्रकांत वळछत्रे (वय 25, रा. तडवळे, ता. कोरेगाव, सध्या रा. लिंब, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चंद्रकांत अंकुश वळछत्रे, शोभा अंकुश वळछत्रे, सोनाली स्वप्निल शिंदे, स्वप्निल शिंदे (सर्व रा. तडवळे) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस हवालदार कुमठेकर तपास करत आहेत.