सातारच्या तरुणांकडून थायलंडमध्ये परदेशी महिलेवर अत्याचार

by Team Satara Today | published on : 24 March 2025


सातारा : महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य सातार्‍यातील दोन तरूणांनी केले आहे. सातार्‍यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये बीचवर 24 वर्षीय जर्मन महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर या दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरूण सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील आहेत. त्यांनी थायलंडमधील बीचवर 24 वर्षीय जर्मन महिलेवर सामूहिक अत्याचार केला. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरूंगात करण्यात आली आहे. या घटनेमुळे सातारकरांची आणि महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.

सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोन जण थायलंड फिरण्यासाठी गेले होते. थायलंडमध्ये दोन भारतीय नागरिक, विजय दादासाहेब घोरपडे (47) आणि राहुल बाळासाहेब भोईटे (40), यांच्यावर एका 24 वर्षीय जर्मन महिलेसोबत हाड रिन बीच, कोह फंगान येथे कथितरीत्या अत्याचार केल्याच्या आरोपाखाली औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 मार्च 2025 रोजी, बेटावरील प्रसिद्ध फुल मून पार्टीनंतर घडल्याचे सांगितले जाते.

थाई अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पीडित महिला त्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होती आणि तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, सुरक्षा कॅमेरा फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे दोघांना अटक करण्यात आली. आरोपींपैकी एक, घोरपडे, याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे, तर भोईटेने कोणतेही गैरकृत्य केल्याचे नाकारले असून, त्याने केवळ महिलेला मिठी मारली आणि गालावर किस केले, त्यानंतर तिने प्रतिकार केला, असा दावा केला आहे. तथापि, न्यायवैद्यक पुरावे, ज्यामध्ये डीएनए नमुन्यांचाही समावेश आहे, ते तपासले जात आहेत.

कोह सामुई प्रांतीय न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटनुसार दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर "संरक्षणाशिवाय असलेल्या पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार करण्याच्या कटात सहभागी" असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दोषी आढळल्यास, त्यांना 4 ते 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 80,000 ते 400,000 थाई बाहत दंड भरावा लागू शकतो. सध्या तपास सुरू असून, कायदेशीर प्रक्रिया पुढे सुरू आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोडोली येथील शेतकर्‍याच्या घरकुलाचे बांधकाम रोखले
पुढील बातमी
सातारा तालुक्यातून दोन दुचाकींची चोरी

संबंधित बातम्या