सातारा शहरात उद्या निघणार भव्य प्रभू श्रीराम शोभायात्रा

आयोध्या फाउंडेशन व काळाराम मंदिर व्यवस्थापनाचे नियोजन

by Team Satara Today | published on : 04 April 2025


सातारा : सातार्‍यातील सामाजिक कार्य करणारे आयोध्या फाउंडेशन महिला मंच आणि काळाराम मंदिर व्यवस्थापनाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 रोजी सायंकाळी पाच वाजता प्रभू श्रीराम रथयात्रेचे रामनवमीनिमित्त आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक विजयकुमार काटवटे यांनी दिली आहे.

या रथयात्रेमध्ये सर्व सक्रिय महिला मानाच्या फेट्यासह सहभागी होणार असून प्रभू श्रीरामाच्या यात्रेसाठी भव्य स्वरूपाचा रथ तयार करण्यात आला आहे. या यात्रेमध्ये प्रभू श्रीरामाची गाणी ढोल ताशाच्या गजरासह म्हणणार आहेत. सर्व व्यक्ती, लहान मुले पारंपारिक वेशभूषेमध्ये सहभागी होणार असून या यात्रेचा मार्ग श्री काळाराम मंदिर, वृंदावन बिल्डिंग, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार चौक, कोल्हटकर आळी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विठोबाचा नळ, राजवाडा बस स्टॅन्ड, गोल मारुती मंदिर, महात्मा गांधी क्रीडा मंडळ, विश्वेश्वर मंदिर व श्री काळाराम मंदिर असा असणार आहे.

सर्व महिलांनी रथयात्रेच्या मार्गावर पाण्याचा सडा टाकून रांगोळ्या काढाव्यात आणि प्रभू श्रीरामाची रथयात्रा दारात आल्यानंतर फटाके वाजवून आरती करावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महापुरुषांच्या अवमान प्रतिबंधाचा कायदा रायगडावरून होणार ?
पुढील बातमी
सातारच्या आयटी पार्कचा उदय सामंत यांच्याकडून पुनरुच्चार

संबंधित बातम्या