सातारा : माण तालुक्यातील पिंपरी येथील एकाचा अपघातात जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद बाळू जाधव (रा. पिंपरी) असे मृताचे नाव आहे. पिंपरी गावच्या हद्दीत गाडीवरून पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांना सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील एका रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा