सातारा : सातारा शहरासह तालुक्यातील दोनजणांविरोधात अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील लक्ष्मी टेकडी, सदरबझार येथे बेकायदा दारु विक्री करणार्या दारु अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. विनोद विठ्ठल भंडलकर (वय 43, रा.सदबरझार) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 625 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या.
दुसरी कारवाई तासगाव ता.सातारा येथे अजित सखाराम जाधव (वय 43, रा. चिंचणेर निंब ता.सातारा) याच्यावर करण्यात आली आहे. सातारा तालुका पोलिसांनी संशयिताकडून 840 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.