सातारा : सातारा जिल्ह्यातील वीज वितरण कर्मचारी अधिकारी कृती समितीच्यावतीने जिल्ह्यामध्ये 72 तासाचे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी वीरवितरणच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. वीज कंपनीमध्ये सुरू असलेली खाजगीकरण आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा अटी निश्चित करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे
या संपामध्ये सातारा जिल्ह्यातील सुमारे 42 ते 20 कर्मचारी सहभागी होणार आहेत. या आंदोलनामुळे पुढील 72 तासांमध्ये साताऱ्यासह अनेक ठिकाणी वीज वितरण विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. वीज कंपन्यांच्या खाजगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात दंड थोपटले आहेत .गुरुवारी सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
कृष्णानगर येथील वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ही निदर्शने करण्यात आली. यामुळे वीज वितरणचे संपूर्ण काम ठप्प झाले आहे. सध्याच्या अस्तित्वातील तीन वीज कंपन्यांमध्ये खाजगीकरण प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला कृती समितीने तीव्र विरोध नोंदवला आहे. याशिवाय कृती समितीची पुनर्स्थापना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अन्यायकारक बदल्या मागे घेणे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा अटी निश्चित करणे या मागण्या करण्यात आलेल्या आहेत शासनाने या संपाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर तांत्रिक अधिकारी व कर्मचारी कृती समितीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.