रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 December 2024


सातारा : रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोवई नाका, सातारा येथे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर सतीश शंकरराव ओसवाल रा. कोडोली, सातारा यांनी स्टेज टाकून स्टेज च्या बाजूला विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावले. यामुळे वाहतुकीस वर आधारित अडथळा निर्माण झाला. अधिक तपास पोलीस हवलदार मोरे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश
पुढील बातमी
लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार

संबंधित बातम्या