सासरच्या त्रासास कंटाळून जावयाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 27 May 2025


सातारा : सासरच्या मंडळींनी सातत्याने मानसिक त्रास देऊन वीस लाख रुपये मागितल्या प्रकरणाचा त्रास होऊन जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 22 मे रोजी घडली आहे. अमोल जाधव असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे

कोमल अमोल जाधव राहणार सातारा, सुरज भोसले राहणार घाडगेवाडी तालुका फलटण, प्रवीण शिवाजी अडसूळ राहणार दत्तनगर कोडोली, शिवाजी जयसिंग आडसूळ राहणार कोडोली, सौरभ सकट राहणार सातारा, विवेक काटकर राहणार सातारा या सहाजणांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. 

सचिन लक्ष्मण जाधव वय 35 मूळ राण सासवड, झणझणे, ता. फलटण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत अमोल याला सासरची मंडळी वारंवार वीस लाख रुपये ची मागणी करून त्रास देत होते. अमोल चे दुसरे लग्न लावूनही त्याच्यावर खोटी केस करून त्याचा मुलगा अद्विक याला भेटण्यास मनाई केली जात होती. या त्रासाला कंटाळून अमोल याने 22 मे रोजी सकाळी सहा वाजता त्याच्या सासरवाडीत राहत्या घरात जिन्याचे अँगल ला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस के कांबळे अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैधरित्या प्राण्यांची कत्तल केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा
पुढील बातमी
पिरवाडी येथे घरफोडी; 72 हजारांचा ऐवज लंपास

संबंधित बातम्या