खा. उदयनराजेंच्या उपस्थितीत आ. शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ उद्या (बुधवारी) मेळावा

by Team Satara Today | published on : 22 October 2024



सातारा : भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व घटकपक्षांच्या महायुतीचे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता शेंद्रे येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे हा मेळावा होणार आहे, अशी माहिती सातारा लोकसभा समन्वयक सुनील काटकर यांनी दिली आहे. 
मेळाव्याच्या नियोजनार्थ सुनील काटकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी काटकर बोलत होते. सातारा शहर आणि सातारा- जावली मतदारसंघात येणारी सातारा तालुक्यातील सर्व गावे यांचा संयुक्त प्रचार मेळावा होणार असून या मेळाव्यात खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट, रयतक्रांती संघटना व घटकपक्षांचे सर्व पदाधिकारी, सातारा जिल्हा परिषद व सातारा पंचायत समितीचे सर्व आजी- माजी पदाधिकारी, सदस्य, सातारा पालिकेचे सर्व आजी- माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला सातारा शहर व सातारा तालुक्यातील सर्व नागरिक व जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुनील काटकर, विधानसभा संयोजक अविनाश कदम, सुवर्णा पाटील, रेणू येळगावकर, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र लवंगारे, शशिकांत वाईकर, शिवसेना शिंदे गटाचे निलेश मोरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.     


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तीन लोकसभा आणि पाच विधानसभा मतदारसंघाची नावे बदलणार
पुढील बातमी
नांदेडसह हिंगोलीला बसले भूकंपाचे धक्के

संबंधित बातम्या