सातारा : सातारा शहरातील गणेशोत्सवाबाबत शहर पोलीस व शाहूपुरी पोलिसांनी बैठक घेवून मंडळांच्या पदाधिकार्यांना सूचना केल्या. यामध्ये प्रामुख्याने मंडळांची परवानगी, गणेश मुर्तीची उंची यावर चर्चा करण्यात आली असून मंडळांच्या मागण्याही यावेळी पोलिसांना सांगण्यात आल्या.
गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा येथील पोलीस दलाच्या अलंकार हॉलमध्ये ही बैठक सोमवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी डीवायएसपी राजीव नवले, पोनि राजेंद्र सावंत्रे, नायब तहसीलदार सुजाता पाटील, उप अभियंता सातारा बांधकाम विभाग, सातारा नगरपालिकेतील अधिकारी तसेच सुमारे 50 हून अधिक मंडळाचे पदाधिकारी, गणेशभक्त उपस्थित होते.
सुरुवातीला गणेश मंडाळांच्या पदाधिकार्यांनी विविध मागण्या, अडचणी पोलिसांना सांगितल्या. सुमारे अर्धा तास यावर चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. यामध्ये गणेश उत्सव विसर्जन मार्ग, विसर्जन ठिकाण, मिरवणूक वेळेस घ्यावयाची काळजी, गणेशोत्सव अनुषंगाने आवश्यक त्या घ्यावयाच्या परवानग्या व योग्य त्या सूचना यावर चर्चा झाली.
सातार्यात गणेशोत्सव शांतता कमिटीची बैठक
by Team Satara Today | published on : 26 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा