रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत

by Team Satara Today | published on : 20 December 2024


सातारा : जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवार दि. 22 रोजी साताऱ्यात आगमन होणार असून यानिमित्ताने त्यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवेंद्रसिंहराजे मित्र समूहाच्या वतीने देण्यात आली आहे.

सातारा- पुणे महामार्गावर निरा नदी पुलाजवळ ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे रविवारी सकाळी 10 वाजता आगमन होणार असून तेथून सताऱ्याच्या दिशेने भव्य रॅली निघणार आहे. महामार्गावर निरा नदी पूल ते शिरवळ, खंडाळा, भुईंज, पाचवड मार्गे कुडाळ, करहर ते मेढा, मेढ्यातून मोळाचा ओढा ते करंजे ते शिवतीर्थ पोवई नाका येथे दुपारी 4 वाजता शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. याठिकाणी सर्व सातारकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोवई नाक्यावरून वाय. सी. कॉलेज मार्गे गोडोली, विलासपूर मार्गे अजिंक्यतारा कारखाना अशी रॅली जाणार असून त्याठिकाणी स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यात येणार आहे.

शेंद्रे येथून बोगदा मार्गे समर्थ मंदिर, राजवाडा ते सुरुची बंगलो अशी रॅली होणार आहे. या रॅलीत निरा पूल येथे सर्व कार्यकर्त्यांनी आपली चारचाकी वाहने घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व पदाधिकारी, सातारा- जावलीतील ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीने करण्यात आले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी
पुढील बातमी
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी

संबंधित बातम्या