सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण शहरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह आदी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी पाटण शहरातील रस्ते, पूल प्रशासकीय इमारत, पिण्याच्या टाकीचे बांधकामास, उपजिल्हा रुग्णालय, पाटण एसटी डेपो यांना भेट देऊन सुरू असलेल्या व पूर्णत्वास येत असलेल्या असलेल्या कामांची पाहणी केली. पाहणी दरम्यान कामाच्या दर्जाबाबत व पूर्णत्वाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
