सातारा : अवैधरित्या म्हैशींच्या वाहतूक प्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ट्रकमध्ये क्षमतेपेक्षाही जास्त म्हैशींची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलीस शिपाई स्वाती ओंबासे यांनी फिर्याद दिली असून, सिध्दार्थ मधुकर गवळी (रा. करवंड, ता. चिखली), रिझवान फकरु कुरेशी (रा. चंदियाना) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे दोघे दि. 21 रोजी कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सातार्यातील हॉटेल फर्नजवळ 17 म्हैशी ट्रकमधून (एमएच 48 सीक्यू 8014) घेवून जाताना आढळले होते. प्राण्यांना क्रुरतेने वागणूक दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक सावंजी तपास करत आहेत.
म्हैशींच्या वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 22 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कला व वाणिज्य महाविद्यालयात एड्स दिनानिमित्त जागरूकता अभियान
December 02, 2025
कांदाचाळ व लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी मिळणार अनुदान
December 02, 2025
एमआरआय दरम्यान वृद्धाला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू
December 02, 2025
दारू पिऊन इंग्लिश मीडियम शाळेत दहशत; शांततेचा भंग प्रकरणी गुन्हा नोंद
December 02, 2025
म्हसवे गावच्या हद्दीत महामार्गालगत ट्रकमध्ये चालकाचा मृतदेह आढळला
December 02, 2025
सातारा शहरात विनयभंगासह दुखापतप्रकरणी एकावर गुन्हा
December 02, 2025
ड्राय डे नावाला, पार्सल मिळतंय भावाला
December 02, 2025