सातारा : कराड, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा, वाई, मलकारपूर व मेढा या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये , निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका मंडळे, महामंडळे इत्यादींना लागू राहील. तसेच उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील.
कराड, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा, वाई, मलकारपूर व मेढा या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून या अनुषंगाने दि. 1 डिसेंबर 2025 रोजीच्या रात्री 10 वाजता प्रचार बंद होईल, असा सुधारित आदेश राज्य निवडणूक आयोग यांच्यातर्फे देण्यात आला आहे.
1 डिसेंबर 2025 रोजीच्या रात्री 10 नंतर सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्ध/प्रसारण देखील बंद होईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी कळविले आहे.