सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास विनोद जगन्नाथ सावंत रा. नागेवाडी, ता. सातारा हे तेथीलच पारेख पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडच्या आडोशाला अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 4 हजार 760 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.