खंडणीसाठी दहशत माजवणाऱ्यांना अटक

तळबीड पोलिसांची पाच जणांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 14 January 2025


कराड : गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील एका मॉलमध्‍ये खंडणी वसूल करण्‍यासाठी नंग्‍या तलवारी नाचवत दहशत माजवून पसार झालेल्‍या पाच जणांना तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाक्‍यावर एका ट्रॅव्‍हल्‍समधून मुंबईकडे जात असताना अटक केली. ही कारवाई रविवारी मध्‍यरात्री करण्‍यात आली.

संबंधीत माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाकडे आली होती. या घटनेची माहिती त्यांनी तळबीड पोलिसांना दिली होती. दरम्यान, रविवारी (ता. १२) मध्यरात्री हे संशयित ट्रॅव्हल्समधून मुंबईकडे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तळबीड पोलिसांनी तासवडे (ता. कराड) येथील टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान संबंधित संशयित पाच आरोपींना सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली.

मिहीर बल्लदेवभाई देसाई (वय २२), प्रिन्स बंजरंगलाल जागीड (वय २३), पवन कनुभाई ठाकूर (वय २५), कैलास कमुरचंद दरजी (वय ३४) जिग्‍नेश अमृतभाई रबारी (वय २६, सर्व जण रा. अहमदाबाद, राज्य गुजरात) अशी याप्रकरणी तळबीड पोलिसांनी कारवाई केलेल्‍यांची नावे आहेत.

हे सर्व जण दिल्‍लीमार्गे गोवा येथून जाऊन दिवसभर फिरून नंतर कोल्हापुरातून मुंबईकडे निघाले होते. सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले व त्यांचे सहकारी कर्मचारी आनंदा रजपूत, दिनकर काळे, योगेश भोसले, शहाजी पाटील, अप्पा ओंबासे, सनी दीक्षित, गणेश राठोड, अभय मोरे, नीलेश विभूते, शीतल मोहिते, अश्विनी थोरवडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऐन हिवाळ्यात विक्रमी वीज मागणी
पुढील बातमी
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठेंचे कुंभमेळ्यात हार्ट अटॅकने निधन

संबंधित बातम्या