पाटण : अडुळपेठ येथे आज रात्री साडेआठ वाजता मोटारसायकल व ट्रकच्या अपघातात येराड येथील युवक जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला आहे. नारायण तुकाराम साळुंखे असे मृत युवकाचे नाव आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कराड-चिपळूण महामार्गावरून कराडकडून दोन्ही वाहने पाटणकडे निघाली होती. अडुळपेठ गावच्या बसथांब्यावर ट्रक चालकाने वेगात मोटारसायकलला धडक दिली. त्यामध्ये मोटारसायकल चालक नारायण साळुंखे याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक वेगाने नेऊन पोबारा केला.