सातारा : येथील शुक्रवार पेठेतील ज्येष्ठ नागरिक व युनायटेड वेस्टर्न बँकेतील निवृत्त अधिकारी विजयराव विश्वनाथ सोहनी (वय 85) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. समीर सोहनी व महावितरण कंपनीतील मुंबई येथील अधिकारी राहुल सोहनी यांचे ते वडील होत. तत्कालीन युनायटेड वेस्टर्न बँकेत विविध कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. विविध क्षेत्रातील व्यक्तींनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.