सातारा : मारहाण प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार शांताबाई नथू गायकवाड रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा यांचा मुलगा अजय नथू गायकवाड व त्याचा मित्र अमोल असे हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी गेले असता हॉटेल मधील अन्नार पालकर रा. गुरुवार परज, सातारा यांच्यासह इतर चार ते पाच लोकांनी अजय व अमोल यास मारहाण केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.