सातारा : येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयात ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
भैरप्पा यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांच्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाले. कन्नड भाषेनंतर मराठी भाषा त्यांच्या अधिक जवळची होती, असे डॉ. संदीप श्रोत्री यांनी सांगितले. भारतीय परंपरेची समृद्धता भैरप्पा यांच्या साहित्यामधून अधोरेखित होते, असे डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले.
नगर वाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांनी भैरप्पा यांच्या प्रतिमेला फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली. नगर वाचनालयाच्या कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वाचनालयाचे संचालक अजित कुबेर, विजयराव पंडीत, विक्रांत भोसले, श्रीकांत कात्रे, ग्रंथपाल रुपाली मुळे, सभासद उपस्थित होते.